जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली. बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जयंत पाटील यांनी कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्विग्न उद्गारही त्यांनी काढले. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाचप्रकारे मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा असून शिवेसना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…तर जलसंपदा विभागच बंद करा!

“कोणत्या मंत्र्याने काय सांगितलं मला माहिती नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून, महाविकासआघाडी मधले महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

जलसंपदा-वित्त विभागातील संघर्ष ही इतिहासाची पुनरावृत्ती

“कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत फूट असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासंबंधी प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. वांद्र्यात लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टवर कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख नसल्यानं आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.

शिवसेनेनं पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या का?; वांद्रेतील लसीकरण केंद्रावरून काँग्रेस आमदाराचा सवाल

जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
“राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तसेच मंत्रिमंडळातील चर्चा ही बाहेर सांगण्याची प्रथा असते त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची आवश्यकता वाटत नाही,” असं सांगत जयंत पाटील यांनी सीताराम कुंटे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याच्या प्रश्नावर बोलणं टाळलं.

“कामकाज करत असताना कोणावर राजी नाराजी धरायची नसते. तेवढ्यापुरता तो विषय असतो. एका विषयाची नाराजी दुसऱ्या विषयावर धरायची नसते. त्यामुळे कोणावर नाराजी हा प्रश्न उद्भवत नाही,” असं त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळातील चर्चा सरकारच्या अंतर्गत बाब असल्याचं सांगत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on maharashtra government cabinet meet mahavikas aghadi jayant patil sgy
First published on: 14-05-2021 at 11:14 IST