स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी पालघर शहरातील शिवसेनेचा उपशाखा प्रमुख व बॅनर व्यवसायिक राजेश घुडे उर्फ बाळा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काही महिन्यांपूर्वी राजेश घुडे याच्यावर गोळीबार झाल्याची घटना दांडेकर कॉलेज रस्ता परिसरात घडली होती. काही अज्ञात इसमांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. अनेक महिने उलटूनही पोलीस तपासामध्ये आरोपी हाती लागत नव्हते. अखेर पोलिसांनी तपास चक्रे अधिक गतीने फिरवून पुरावे गोळा करायला सुरुवात केली. त्यामध्ये घुडे याने स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याचे समोर आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर पोलिसांनी त्याला काल रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा कट रचला असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याची माहिती पालघरच्या पोलीस उप अधीक्षकांनी दिली. पोलिसांनी आरोपी म्हणून त्याला आज न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी तो अनेक खटाटोप करीत होता अशी चर्चा सर्वत्र आहे.