महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आघाडीचा मल्ल सिकंदर शेख याच्या पराभवाची जास्त चर्चा होत असतानाच सिकंदर शेख आणि त्याला पराभूत करणाऱ्या महेंदूर गायकवाड हे दोघेही येत्या २४ जानेवारी रोजी सोलापुरात मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित कुस्तीच्या फडात सहभागी होणार आहेत. परंतु, त्यांची कुस्ती मात्र होणार नाही. दोघेही वेगवेगळ्या मल्लांबरोबर लढणार आहेत.

भीमा साखर कारखान्याचे संस्थापक भीमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ आणि भीमा परिवाराचे अध्वर्यू खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कुस्ती फडात प्रथम क्रमांकाची भीमा केसरी किताबासाठी कुस्ती सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात होणार आहे. विजेत्या पैलवानाला रोख बक्षीस आणि चांदीची गदा दिली जाणार आहे.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा

हेही वाचा – शुभांगी पाटील यांच्याकडून बाळासाहेब थोरातांची भेट घेण्याचा प्रयत्न; सत्यजीत तांबेंनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

या फडामध्ये अन्य चार प्रमुख लढती होणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपान्त्य फेरीत सिंकदर शेखला गुणांच्या आधारे पराभूत केलेल्या महेंद्र गायकवाड याची भीमा वाहतूक केसरीसाठीची चार क्रमांकाची कुस्ती पंजाबच्या गोरा अजनालाबरोबर लढली जाणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या भीमा साखर केसरी किताबाची कुस्ती भारत केसरी माऊली जमदाडे आणि बालारफी शेख यांच्यात होणार आहे. तर भीमा कामगार केसरी किताबासाठी मुंबई महापौर केसरी गणेश जगताप आणि अक्षय शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचा – जळगाव जिल्हा दूध संघातील नोकरभरती रद्द; अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची माहिती, खडसेंना दणका

भीमा सभासद केसरीसाठी पाच क्रमांकाच्या कुस्तीसाठी अक्षय मंगवडे आणि संतोष जगताप हे मल्ल भिडणार आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी माहिती दिली. संपूर्ण कुस्ती फडासाठी नऊ लाख रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे दिली जाणार आहेत.