सावंतवाडी : शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (TET) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ४ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनांच्या सिंधुदुर्ग शाखेने दिली आहे.

​सर्वोच्च न्यायालयाने सध्या कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे सक्तीचे केले आहे. तसेच, येत्या दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्त होण्याचा आणि पदोन्नतीसाठीही टीईटी बंधनकारक करण्याचा निर्णय दिला आहे.

​या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली आहे.

​मूक मोर्चाची वेळ आणि सहभागी संघटना

​या महत्त्वाच्या मागणीसाठी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.