सांगली : मोटार व एसटी बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी गुहागर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यात घडली. जखमी प्रवाशांवर नागजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर घरी पाठविण्यात आले.

कराडहून जतला निघालेली बस (एमएच १४ व्हिटी ३४०१) जतकडे निघाली असता पाचेगाव फाट्याहून येणारी मोटार (एमएच ४२ झेड ५५४४) ही अचानक समोर आली. या बसची आणि मोटारीची धडक झाली. मोठी हानी चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाने बस पीकअप शेडकडे वळवली. यामुळे होणारा भीषण अपघात टळला असला तरी सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमीमध्ये महादेव रूपनूर (रा. रेवनाळ), बाळू शेख (रा. धावडवाडी), मारुती भोसले (रा. हिवरे), बबन फंडे (रा. जत), गणेश पवार (रा. तिपेहळ्ळी) आणि कांचन गीते (रा. जत) या प्रवाशांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर नागज येथील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले.