कराड : पाऊस आणि ढगाळ, दूषित वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले असताना, शामगाव (ता. कराड) येथे पाणी दूषित पिण्यामुळे कावीळचे सहा रुग्ण आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही बाब गांभीर्याने घेवून संबंधित अधिकारी शामगावात तातडीने दाखल झाले. त्यांनी उपाययोजनांसाठी ठोस पावले उचलली आहेत.
कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी जुन्या पाणी योजने बंद करून नवीन नळपाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना या वेळी दिल्या. शामगावात दूषित पाणी पिण्यात आल्याने गेल्या चार दिवसांपासून अनेक ग्रामस्थ पोटदुखी, अंगदुखी, पोट बिघडणे, ताप, थंडी वाजून येणे अशा कारणांनी आजारी आहेत. त्यातील सहा ग्रामस्थांना कावीळ झाल्याचे निदान झाल्याने शामगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले. यावर संबंधित यंत्रणा शामगावकरांच्या आरोग्यासाठी सतर्क झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व पाणी तपासणी पथकही दाखल झाले तर, लगेचच कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जुनी नळपाणी पुरवठा योजना बंद करून नवीन नळपाणी योजनेतून पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामस्थांना कावीळ व संसर्गजन्य आजारावरील औषधांचा संचही या वेळी देण्यात आले.
ग्रामस्थांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, नवी नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्याचा प्रयत्न असून, पाणी उकळून प्यावे, गावातील पाणी एटीमचा ग्रामस्थांनी वापर करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, गटविकास अधिकारी एस. टी. बर्गे, आरोग्य अधिकारी डॉ. मैथली मिर्जे, सरपंच विजय पाटोळे, ग्रामसेविका एन. एस. देशमुख, माजी उपसरपंच बाळासाहेब पोळ, ग्रामपंचायत सदस्य राहुल पोळ आदी यावेळी उपस्थित होते.
जुनी गावची नळपाणी पुरवठा कालबाह्य झाली असल्याने ठिकठिकाणी पाण्याची गळती आहे. तर सध्या बोंबाळवाडी तलावा नजीकच्या विहिरीतून पाणी आणले जात असून, हे पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थ वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत. त्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी व आरोग्य विभागांचे अधिकारी यांनी गावात येऊन नळ पाणी पुरवठा योजनेची पाहणी तसेच गटराची