सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असून भाजपाने महापौरपद राखलं आहे. भाजपाच्या श्रीकांचना यन्नम यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. श्रीकांचना यन्नम यांना एकूण ५१ मतं मिळाली. नूतन महापौर श्रीकांचना यन्नम या विणकर समाजाच्या आठव्या आणि पहिल्याच महिला महापौर ठरल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल असा दावा केला होता. मात्र भाजपाने बाजी मारल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याचं चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी एमआयएमच्या शाहजादीबानो शेख यांचा ५१ विरूध्द ८ मतांनी पराभव केला. महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचा महाविकास आघाडी गठीत करून सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न फसला.

आणखी वाचा- “सेनेला मुख्यमंत्रिपदाचं गाजर देऊन पवारांनी तिघाडी सरकार बोकांडी बसवलं”

महापौर निवडीच्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा इत्यादी पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला महापौर निवडून आणणे सहज सोपे झाले. आश्चर्य म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व बसपाच्या स्वाती आवळे यांनीही भाजपला मतदान केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur mayor bjp shrikanchna yannam mahavikas aghadi sgy
First published on: 04-12-2019 at 13:45 IST