सोलापूर : घरात शिळे जेवण वाढल्याच्या कारणावरून संतापलेल्या जावयाने वृद्ध सासूवर सशस्त्र हल्ला करून तिच्या हाताचे बोट छाटल्याचा प्रकार अक्कलकोटमध्ये घडला. घटनेनंतर हल्लेखोर जावई पळून गेला. त्याचा शोध अक्कलकोट उत्तर पोलीस घेत आहेत.

हेही वाचा – नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !

हेही वाचा – कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?

लक्ष्मी प्रल्हाद जाधव (वय ६७, रा. टिळक गल्ली, अक्कलकोट) असे जखमी वृद्ध सासूचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा जावई ज्वाला प्रसाद पाठक याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी लक्ष्मी जाधव दररोज मोलमजुरी करून मुलगी व जावई यांच्यासह घरात एकत्र राहतात. दुपारी जावई ज्वाला पाठक दारू पिऊन घरात आला. लक्ष्मीबाईंनी त्यास जेवण वाढले असता जेवण शिळे असल्याचे सांगत जावयाने गोंधळ घातला. जेवण ताजे असून सकाळी तयार केल्याचे समजावून सांगितले तरी संतापलेल्या जावयाने सासू लक्ष्मीबाई यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हाताचे बोट छाटून बाजूला पडले. घटनेनंतर जावई ज्वाला याने पलायन केले.