सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूरच्या पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शहा यांना दिला जाणार आहे. ही घोषणा कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या व्यक्तीस जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. पालवी संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही, एड्सग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंगल शहा यांच्याकडून होत आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून नवी दिल्लीच्या नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, एचएसएनसी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत.
अन्य पुरस्कार
- उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर
- उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर
- उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): डॉ. भाग्येश बळवंत देशमुख, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
- उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): राजीव उत्तम खपाले, लेखापाल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
- उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन: डॉ. शिरीष शामराव बंडगर, वरिष्ठ लिपिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
- उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार: नवनाथ नागनाथ ताटे, चौकीदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
- उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय): राजेंद्र शंकर गिड्डे, वरिष्ठ लिपिक, मारुतीराव हरिराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब
- उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): दत्ता निवृत्ती भोसले, ग्रंथालय परिचर, छत्रपती श्री शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर आणि डॉ. रेवप्पा सिद्धाप्पा कोळी, प्रयोगशाळा परिचर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.