सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना प्रशासकीय कामकाजातील अनेक आक्षेपार्ह त्रुटी आणि कर्तव्य कुचराई केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. सोलापूरच्या अगोदर लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना तेथील कारभार त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून आले.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेतही खमितकर यांच्या कारभाराबद्दल अनेक गंभीर तक्रारी असून त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबात शिफारस केली आहे. लातूर जिल्हा परिषदेत  समाजकल्याण आधिकारी म्हणून कार्यरत असताना असताना  त्यांच्या कामकाजातील विविध त्रुटी निर्माण होण्याच्या अनुषंगाने वारंवार चुकीचे काम करण्याची सवय आणि अशोभनीय वर्तन दिसून आले. त्याबाबत चौकशीनुसार खमितकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुणे विभागीय समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोटिया यांनी हा निलंबनाचा आदेश जारी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur zilla parishad social welfare officer sunil khamitkar suspend over negligence in duty zws
First published on: 20-03-2024 at 22:09 IST