दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

दुपारी एक वाजता जाहीर होणार ऑनलाइन निकाल

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State board ssc hsc result will declare on wenesday dmp

ताज्या बातम्या