सांगली : सांगलीतील भावे नाट्यमंदिरात सातव्या पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सोमवारी प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन पीएनजी सराफ व जव्हेरीचे संचालक राजीव गाडगीळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले असून, उद्या मंगळवारी स्पर्धेचा अंतिम दिवस आहे.

आज सकाळी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, नाट्य परिषद शाखाध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, स्पर्धा समितीचे अध्यक्ष सचिन पारेख आणि अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे, श्रीनिवास जरंडीकर, अंजली भिडे उपस्थित होते. नरेंद्र आमले आणि मधुवंती हसबनीस हे स्पर्धेचे परीक्षण करीत आहेत.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अकरा महाविद्यालयांनी दर्जेदार  सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. उंच माझा झोका ,मिठाई,अव्यक्त , लेबल,  एक एप्रिल ,कलंदर , नेकी  दर्शन ,असं यूसलेस जिनीअस,ग्वाही,चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध  या एकांकिकांचे दमदार सादरीकरण झाले. विविध  आशय आणि विषय घेऊन सादर झालेल्या  एकांकिकांमुळे आजची तरुणाई नाविन्यपूर्ण आणि सफाईदार सादरीकरणासाठी सक्षम असल्याची भावना यावेळी उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.

आज या स्पर्धेत सादर होत असलेल्या एकांकिका राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूर, एकांकिका -हाफ वे, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, एकांकिका- प्रेम की यातना. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,नागठाणे- एकांकिका- सोयरीक. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे ,एकांकिका- इन बिटवीन ऑफ. भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर, एकांकिका- एक डॉट.  मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय पुणे, एकांकिका -बोहाडा. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडा कोल्हापूर एकांकिका- चारित्रांगत.

मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड पुणे, एकांकिका- वामन आख्यान. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय कोल्हापूर, एकांकिका -एका हाताची गोष्ट. रात्री स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ व झव्हेरीचे संचालक सिध्दार्थ गाडगीळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. स्पर्धेचे व्यवस्थापन अमोल गोसावी,शशांक लिमये, अनिरुद्ध जेरे, मयुरेश पाटील ,प्रसाद कुलकर्णी, मोहन बापट, हेमंत जोशी , शिरीष उकिडवे,केतकी कुलकर्णी, राघवेंद्र जेरे, आत्मजा गोसावी, रागिणी चितळे , शर्मिला पाठक ,सुप्रिया उकिडवे, अपर्णा पटवर्धन, मंजुषा जरंडीकर, माणिक जोशी यांनी केले आहे.