३१ लाखांची निविदा मंजूर; पुण्यातील शिल्पकार शिरगावकर शिल्प साकारणार

नगर : महापालिकेच्या आवारात दर्शनी भागात, छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फूट उंचीचा सिंहासनारूढ ब्रॉंझ पुतळा येत्या ६ महिन्यांत बसवला जाणार आहे. त्यासाठीची पुणे येथील शिल्पकार नवीन शिरगावकर यांच्या ‘ऋषी आर्ट’ची पुतळा तयार करण्याची ३० लाख ९४ हजार रुपये दराच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. ही निविदा सर्वात कमी दराची आहे. यासह एकूण चार निविदा मनपाला प्राप्त झाल्या होत्या.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video
chhatrapati sambhajinagar, paithan, dispute between descendants of sant eknath
पैठणमध्ये नाथवंशजांमधील वाद पुन्हा उफाळला; छाबिना मिरवणूक चार तास रखडली

स्थायी समितीची सभा आज गुरुवारी सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात या निविदेला मान्यता देण्यात आली. यावेळी सभापती व समिती सदस्यांना छत्रपतींचे नियोजित ‘क्ले मॉडेल’ दाखवण्यात आले. या कामाबरोबरच मनपा प्रशासनाने पुतळा उभारण्याचा चबुतरा व मागील बाजूच्या सुशोभीकरणाचे काम लगेचच सुरू करावे, अशी सूचनाही सभापती वाकळे यांनी केली. सर्वात कमी दराची निविदा मंजूर केल्याने पुतळय़ाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी सूचना सदस्य विनित पाऊलबुधे, गणेश कवडे, रवींद्र बारस्कर आदींनी केली.

राज्य सरकारच्या कला संचालनालयाच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष पुतळानिर्मितीचे काम सुरू होईल, असे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. काही सदस्यांनी पुतळय़ावर मेघडंबरी आवश्यक असल्याची सूचना केली. पुतळा दर्शनी भागात असावा यासाठी मनपा आवाराचे दोन गेट बंद करून एकच गेट समोरच्या बाजूने मधोमध केले जाईल, त्यामुळे रस्त्यावरून जाताना तसेच आवारात शिरताच प्रथम सिंहासनारूढ छत्रपतींच्या पुतळय़ाचे दर्शन होईल, असेही वाकळे यांनी स्पष्ट केले. ‘ऋषी आर्ट’चे शेगावकर यांनी पुतळय़ाबाबत माहिती दिली. पुतळा सिंहासनारूढ १२ फूट उंचीचा व ८ फूट रुंदीचा असेल, तो गनमेटल व इंडस्ट्रीयल ब्रॉंझपासून तयार केला जाईल. त्यामध्ये कॉपर ७२ टक्के, टीन ८.५ टक्के िझक १७.९ टक्के, लीड १.६ टक्के असेल. वजन १८०० ते २ हजार किलो असेल. पुतळा सहा महिन्यात तयार करून पोहोच केला जाईल. रंग वगळता पुतळय़ाला आजीवन हमी राहील, तरीही पाच वर्षे त्याची देखभालीचे काम स्वीकारले जाईल.

‘ही घटना माझ्यासाठी अभिमानास्पद’

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरमध्ये महापालिकेने उभारावा, अशी मागणी आपण पाच वर्षांपूर्वीच्या महासभेत केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या सहा महिन्यात उभारला जाईल. त्याची निविदा आपण सभापती झाल्यानंतरच्या पहिल्याच सभेत मंजूर करण्यात आली, ही बाब माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, असे सभापती कुमार वाकळे यांनी सांगितले.