दिल्लीत नराधमांच्या अत्याचारास बळी पडलेल्या तरुणीच्या मृत्यूने संवेदनशील नागपूरकरांनाही धक्का बसला. ही सुन्न करणारी घटना असून महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे तयार करणे हीच तिला श्रद्धांजली ठरेल, या शब्दात आमदार देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
दिल्लीमधील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू धक्कादायक असून अत्यंत सुन्न करणारी ही घटना आहे. तिने मृत्यूशी केलेला संघर्ष व तिची इच्छाशक्ती ही अतुलनीय असून भारतीय राज्यव्यवस्था व समाज व्यवस्थेपुढे फार मोठे आव्हान या घटनेने उभे केले आहे. व्यवस्था परिवर्तन तसेच महिलांवरील अत्याचारास आळा घालण्यासाठ अत्यंत कठोर कायदे तयार करणे हीच तिला श्रद्धांजली ठरेल, असे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सिंगापूरमध्ये उपचार घेत असलेल्या त्या तरुणीच्या मृत्यूची बातमी येताच अनेकांना धक्का बसला. शहरात व्हरायटी चौक, फुटाळा तलावसह विविध ठिकाणी मेणबत्ती मिरवणूक काढून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हरायटी चौकात तोंडावर काळी पट्टी बांधून व मौन धारण करून या घटनेचा निषेध केला. त्या तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील, प्रगती पाटील, नूतन रेवतकर, राजेश कुंभलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. शहर युवक काँग्रेसतर्फे आरबीआय चौकात मेणबत्ती मिरवणूक काढून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली.
समीर मेघे, रवींद्र राणा, अमित मुळक, दीक्षा राऊत, देवेंद्र जैन यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते. युवा चेतना मंचनेही अत्याचार पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण केली. तिच्या मृत्यूमुळे समाजमन पेटून उठले आहे. अशावेळी ३१ डिसेंबरला नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा अशा हॉटेल्समोर आंदोलन करण्याचा इशारा, मंचचे अध्यक्ष दिलीप दिवटे, विवेक पोहाणे, दत्ता शिर्के व इतर पदधिकाऱ्यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘कठोर कायदे करणे हीच ‘त्या’ दुर्दैवी तरुणीला श्रद्धांजली’
दिल्लीत नराधमांच्या अत्याचारास बळी पडलेल्या तरुणीच्या मृत्यूने संवेदनशील नागपूरकरांनाही धक्का बसला. ही सुन्न करणारी घटना असून महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे तयार करणे हीच तिला श्रद्धांजली ठरेल, या शब्दात आमदार देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
First published on: 30-12-2012 at 03:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strick law is real homage to rape victim