अहिल्यानगर : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून न्यायालयाने मुक्तता केलेले हिंदुत्ववादी नेते सुधाकर चतुर्वेदी यांचा नगर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने गावोगावी सभा घेऊन, नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
तसेच माध्यमांशी बोलताना चतुर्वेदी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कटकारस्थान करत भगवा दहशतवादी ठरवून हिंदूंना अटक केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, गृहमंत्री कृपाशंकर सिंह व नबाब मलिक यांनी रा. स्व. संघाला बदनाम करण्यासाठी भगवा दहशतवाद असा आरोप केला. या प्रकरणाचे तपासी अधिकारी हेमंत करकरे यांची हत्याही त्यांनीच घडवून आणल्याचा खळबळजनक दावा चतुर्वेदी यांनी केला.
श्री सुधाकर चतुर्वेदी यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सागर बेग, राजेंद्र चोपडा, माजी उपमहापौर गणेश भोसले, भाजपचे सरचिटणीस निखिल वारे, अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी चतुर्वेदी म्हणाले, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरात आरडीएक्स ठेवून, माझ्यावर खोटे आरोप करून मला अडकवले. अटक केलेल्या सर्व हिंदुत्ववाद्यांचा तुरुंगात छळ करण्यात आला. आमच्या विरोधात एकही सबळ पुरावा नसल्याचे तत्कालीन तपासी अधिकारी हेमंत करकरे यांना कळले होते. त्यामुळे आमची सुटका होऊ नये म्हणून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली. आता आम्हाला १७ वर्षांनी न्याय मिळाला. न्यायालयाने आम्हाला निर्दोष सोडले. परंतु आमच्या आयुष्यातील महत्त्वाची १७ वर्षांची फेड कोण करणार? आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने गावोगावी सभा घेऊन, नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचेही सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कटकारस्थान करत भगवा दहशतवादी ठरवून हिंदूंना अटक केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, गृहमंत्री कृपाशंकर सिंह व नबाब मलिक यांनी रा. स्व. संघाला बदनाम करण्यासाठी भगवा दहशतवाद असा आरोपही चतुर्वेदी यांनी केला.
यावेळी श्री चतुर्वेदी यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भागवत कुरधने, गणेश गोरे, मंगेश खताळ, सत्यजित धवन, मयूर बांगरे, संतोष ढाकणे, दिलीप पवार, अनिल झिरपे, संग्राम सूर्यवंशी, सचिन पवार, नीलेश हिंगे, सागर गुंजाळ, प्रशांत हातरुणकर, मनीष फुलडहाळे आदी उपस्थित होते.