गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुलगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची निवड मागील महिन्यात झाल्यानंतर पानगाव येथील खासगी पनगेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांची अविरोध निवड झाली. दोन कारखान्यांच्या अध्यक्षपदी मायलेकीची निवड होण्याची बहुधा ही राज्यातील पहिलीच वेळ.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १५ वर्षांपूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. तर खासगी तत्त्वावर पानगाव (ता.रेणापूर) येथे पनगेश्वर साखर कारखान्याची निर्मिती केली. दोन्ही कारखान्यांचा कारभार मुंडेच पाहात. मुंडे यांच्या निधनानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक मागील महिन्यात झाली. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. तर पनगेश्वर कारखान्याचे अध्यक्ष किसनराव भंडारे यांचा कार्यकाल संपल्यानंतर नुकतीच संचालक मंडळाची बठक होऊन त्यात गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2015 रोजी प्रकाशित
कारखान्यांची धुरा मुंडे मायलेकीकडे
गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुलगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची निवड मागील महिन्यात झाल्यानंतर पानगाव येथील खासगी पनगेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांची अविरोध निवड झाली.

First published on: 15-06-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar factories power to mundes family