सोलापूर : विश्वासघात, फसवणूक, बदनामी, एकतर्फी प्रेमातून होणारा त्रास, ब्लॅकमेलिंगमुळे हळदीच्या अंगावर नववधूने लग्नाच्या घरात केलेली आत्महत्या, इतर दोन तरुणींच्या विश्वासघात आणि छळामुळे केलेल्या आत्महत्यांच्या लागोपाठ घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर हादरले असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिन्ही दुर्दैवी मृत तरुणींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतली. या तिन्ही घटनांचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने होत असल्याचा दावा करून चाकणकर यांनी पोलिसांची पाठ थोपटली. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

कुमठे येथे ओम नमः शिवाय नगरात सालिया महिबूब शेख (वय २५) हिने स्वतःच्या लग्नाच्या दिवशीच तिघा टवाळखोरांकडून एकतर्फी प्रेमातून झालेले ब्लॅकमेलिंग आणि प्रचंड त्रास होऊन लग्नही मोडल्यामुळे निराश होऊन हळदीच्या अंगावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार घडण्यापूर्वी मृत सालिया व तिच्या वडिलांनी संबंधित पोलीस ठाण्यात टवाळखोरांविरुद्ध लेखी तक्रार नोंदविली होती. परंतु पोलिसांकडून वेळीच गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे टवाळखोरांचे मनोबल वाढले आणि त्यातूनच सालिया हिने नैराश्यामुळे स्वतःचे आयुष्य संपविले. लागोपाठ घडलेल्या अन्य दोन घटनांमध्ये दोन तरुणींनी विश्वासघात, छळवणूक यामुळे आत्महत्या केली होती.

हेही वाचा – सांगली : अपहरण करुन परप्रांतीय कामगारास खंडणीसाठी मारहाण

हेही वाचा – “मोदींच्या नवभारताचा रस्ता महाराष्ट्रातूनच जातो”, डॉक्टरेट मिळाल्यानंतर फडणवीसांनी वाचला राज्यातील विकासाचा पाढा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तिन्ही घटनांची राज्य महिला आयोगाने दखल घेऊन पोलिसांकडून आहवाल मागविला आणि नंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सोलापुरात दाखल होऊन तिन्ही घटनांच्या प्रकरणांचा आढावा घेतला. सालिया शेख आत्महत्या प्रकरणात, घटनेपूर्वी सालिया हिने दिलेल्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल घेऊन संबंधित तिघा तरुणांवर प्रतिबंधक कारवाई केली होती. एकूणच तिन्ही प्रकरणांचा पोलीस चांगल्या पद्धतीने तपास चालविल्याचा दावा चाकणकर यांनी केला. यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनीही स्पष्टीकरण दिले. परंतु घटनेपूर्वी सालिया हिने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित तिन्ही तरुणांवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचे स्वरूप काय होते ? या कारवाईच्या पश्चातही सालिया हिने आत्महत्या करण्याइतपत संबंधित टवाळखोर तरुणांकडून आणखी जास्त त्रास कसा झाला, याचे उत्तर चाकणकर व पोलीस आयुक्त माने यांच्याकडून मिळाले नाही.