scorecardresearch

राज्यातील शाळांना लवकरच लागणार उन्हाळी सुट्ट्या? शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर

विदर्भातल्या शाळांना अधिक काळ सुट्टी घोषित करण्यात यावी, असंही या प्रस्तावात म्हटलं आहे.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : राज्यातील शाळांना २ मे ते १२ जून या कालावधी, उन्हाळी सुटी जाहीर करण्यात यावी. तर आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून,  तर विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला आहे. 


करोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच घेतला. त्यानंतर उन्हाळी सुटीचे काय असा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता येण्यासाठी शासन स्तरावरून निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून शासनाला  सादर करण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Summer vacations to schools in maharashtra government declared the duration pune print news vsk