पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली आहे. तसेच काल संजय राऊत यांच्या पत्नी वर्षाराऊत यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. यासंदर्भात बोलताना संजय राऊत याचे भाऊ सुनील राऊत यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा संजय राऊत यांना घाबरते, त्यामुळे त्यांना ईडीच्या जाळ्यात अडकवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला तरी शिवसेना सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात, फडणवीस म्हणाले “त्या १६ मतदासंघात…”

“आज सकाळीच नेहमीप्रमाणे संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. ते सद्या ठणठणीत आहेत. संजय राऊत हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. ते बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. त्यामुळे संजय राऊत भष्ट्राचार करू शकत नाही. गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे ते ज्याप्रकारे भाजपाविरोधात लढत आहेत. त्यामुळे त्यांना ईडीच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे. काल वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स आले होते. उद्या कदाचित मलाही बोलवण्यात येईल. पण मी मला भाजपाला एवढंच सांगायचं आहे, की आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय केला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अबू आझमीला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे – संभाजीराजे छत्रपतींचं माध्यमांसमोर विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये काहीही दम नाही. खरं तर मुंबईत कोणी किती संपत्ती गोळा केली आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आमच्या प्रत्येक संपत्तीची लिंक पत्रचाळ प्रकरणाशी लावण्यात येत आहे.”