शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून त्यांना येत्या ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राऊतांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त केला आहे. राऊतांवरील कारवाईवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असल्या तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. याच कारणामुळे ईडीच्या कारवाईमुळे शरद पवार गप्प का? यावर पवार यांची मुलगी तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबबत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> Sanjay Raut Arrest: ईडीची आणखी दोन ठिकाणी छापेमारी, सर्च ऑपरेशन सुरु

“देशात आणि राज्यात काहीही झालं तरी शरद पवार यांच्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख असो किंवा आता संजय राऊत, आम्हाला या गोष्टी अपेक्षित होत्या. आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत. आरोप झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून सर्व तपाससंस्थांना सहकार्य करायचे, असे आम्ही ठरवले होते. आम्ही आमचे कुटुंब आणि देशाला उत्तरदायी आहोत,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

हेही वाचा >>> ईडीची मोठी कारवाई! सोनिया गांधी व राहुल गांधींच्या चौकशीनंतर नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा

शरद पवार यांच्या मौनावर उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही बोला ना, मला या प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत. कारण मी संजय राऊत यांच्या घरी जाऊन आलो. मी पुन्हा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत. संजय माझा जुना मित्र आहे आणि म्हणूनच त्याला मी अरेतुरे करतोय. तो एक कट्टर शिवसैनिक आहे. त्याने या दंडेलशाहीविरोधात न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी टाकली आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा >>> ‘एक साधा आमदार’ म्हणणाऱ्या बंडखोर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांना असाच विचार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना रविवारी (३१ जुलै) रात्री उशिरा अटक केली. राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.