केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी कुणाची? यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. यावरून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. कोर्ट कचेरी, करणार नाही म्हणाले होते. तेच आयोगात हजर होते, अशी टीका भुजबळांनी पवारांवर केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ काय म्हणाले?

“शरद पवार म्हणाले होते कोर्ट, कचेरी करणार नाही. तेच निवडणूक आयोगात हजर होते. शरद पवार म्हणतात, मी राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे. मग मी सुद्धा संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्याच घरी राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं. मग, आमचाही खारीचा वाटा आहे की नाही?” असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना विचारला होता.

हेही वाचा : “भाजपा देवेंद्र फडणवीसांवर अन्याय करत आहे, याच्या वेदना…”, सुप्रिया सुळेंचं विधान

याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता,” असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्या सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा : ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? भरत गोगावले म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आईने माझ्यावर केलेले संस्कार थोडेसे वेगळे आहेत. ज्यांच्या ताटात एकत्र जेवलो, ते कधी विसरायचं नसते. छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. छगन भुजबळांना मी उत्तर देऊ शकते. पण, मी उत्तर देणार नाही. कारण, ते वयाने मोठे आहेत. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता,” असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी भुजबळांवर केला आहे.