जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांनाच आम्ही संधी देतो. इतरांना देत नाही असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलं आहे. तसंच भाजपावर त्यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयुक्तांनी तडकाफडकी राजीनामा का दिला ते समजलेलं नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्याचं सत्य बाहेर येईल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?

“आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की प्रणिती शिंदेंना तिकिट मिळावं. मात्र हायकमांडचा निर्णय जो असेल तो आम्ही मान्य करु. प्रणितीलाच नाही तर काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तिकिट दिलं तरीही आमची तयारी सुरु आहे. आमच्या प्रांताध्यक्षांनीही प्रभारी अध्यक्ष इथे नेमले आहेत. शुभा चव्हाण सरचिटणीस म्हणून काम करत आहेत. लवकरच आता आपल्याला याबद्दल समजेल.”

शिंदे यांचा भाजपाला टोला

“भाजपाला उमेदवार मिळत नाही हे खरं आहे. ते कुणीतरी छुपारुस्तुम कुणीतरी काढतील. मागच्यावेळी ज्याला उभं केलं त्याचं जात प्रमाणपत्र नाही. आता अजून कुणाचं काय काढतील ते सांगता येत नाही.” असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. “प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर येतील अशी आमची खात्री आहे. मागच्यावेळचे अनुभव त्यांच्याकडे आहेत त्यामुळे ते आमच्यासह येतील असा विश्वास वाटतो.” असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

हे पण वाचा- Ashok Chavan : “इंडिया शायनिंगच्या वेळीही…”, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणुका जवळ आल्यावर अशा प्रकारे धाडी टाकणं चांगलं नाही. दहशत निर्माण करु नये, उलट मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत. ” असंही मत शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर झालेल्या कारवाईवर व्यक्त केलं.