वणी येथील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्याच्या घटनेवरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसेच राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेसुद्धा चांगल्याच संतापल्याचे बघायला मिळालं.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ प्रसारित करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. आम्ही सगळे कायद्याचा सन्मान करणारी लोक आहोत. निवडणुकीच्या काळात बॅगा तपासल्या जात असतील, तर निश्चितच आम्ही त्या कृतीचं समर्थन करतो. त्यावर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही. परंतु आमच्या बॅगा तपासल्या जात असतील, तर कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. मग अशाचप्रकारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्या बॅग तपासल्या जातील का?” असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

“निवडणूक निष्पक्षपणे पार पडेल असं वाटत नाही”

“निवडणूक आयोगाने ज्या व्यक्तीची बॅग तपासली आहे, ती व्यक्ती राज्याची माजी मुख्यमंत्री आहे. एका प्रतिष्ठीत व्यक्तीची बॅग तुम्ही तपासता तेव्हा तो फक्त त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा नाही, तर राज्यात त्यांना मानणाऱ्या मतदारांचा अपमान आहे. यातून एका वेगळ्याच गोष्टीचा वास येतो आहे. या सगळ्यानंतर राज्यातील निवडणूक निष्पक्षपणे पार पडेल, असं वाटत नाही”, अशा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील बॅगांची तपासणी

दरम्यान, वणी येथील महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमदेवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी १ वाजता हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हेलिपॅडवर ते उतरले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करत असताना तेथे अचानक काही पोलीस व निवडणूक विभागाचे तपासणी पथक दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरने आलेल्या व्यक्तींच्या बॅगा तपासायच्या असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Bala Nandgaonkar : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी असलेलं रक्ताचं नातं जपावं, अजूनही..”, कुठल्या नेत्याने केली विनंती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकाराने हेलिपॅडवर काही काळ गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. स्वत: उद्धव ठाकरे तपासणी पथकाला हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात, असा प्रश्न केला. बॅगा सर्वांच्याच तपासता का? असे त्यांनी विचारले. तपासणी पथकाने हे आपले काम असल्याचे सांगत बॅगा तपासणीस सुरूवात केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वत: या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केले. या तपासणीत पथकाच्या हाती काही लागले नाही. मात्र यामुळे वणीतील वातावरण चांगलेच तापल्यांचं बघायला मिळालं.