शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट कधीही ठाकरे गटात येऊ शकतात, असा दावा केला. संजय शिरसाटांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, असाही दावा अंधारे यांनी केला. त्या जळगाव जिल्ह्यामध्ये महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “दीपक केसरकर एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. प्रवक्ते म्हणून त्यांना ती भूमिका मांडणे भाग आहे. त्यामुळे ते त्यावर काहीच बोलणार नाही. त्यांनी काहीच न बोलता हसण्यावारी हा विषय उडवून लावणं स्वाभाविक आहे, पण त्यांना खरंच त्याचं गांभीर्य कळत नाहीये.”

“मी खरंच पुन्हा पुन्हा सांगतेय की, संजय शिरसाटांवर जो अन्याय झाला आहे त्यामुळे ते कधीही परत फिरू शकतात. मी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करते,” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “संजय शिरसाठ यांना बोलण्यासाठी अडचण निर्माण होते हे निश्चित खरं आहे. संजय शिरसाट गुवाहटीवरून आल्यावर शिंदे सरकारची बाजू मांडत होते. मात्र, संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या इतर आमदारांना अधिकार दिल्याने संजय शिरसाटांची कुचंबना होत आहे. त्यामुळे ते केव्हाही परत फिरू शकतात.”

हेही वाचा : VIDEO: सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, “सरकार उलथवून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे नेते तुषार भोसले यांनी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला. “भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी असे सुपारीबाज ठेवले आहेत. त्यांचा बुद्ध्यांक किती आहे हे मला माहिती आहे. अशा लोकांच्या टीकेला मी महत्त्व देत नाही. त्यावर मी उत्तरही देत नाही,” असं सुषमा अंधारेंनी म्हटलं.