रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, काही लोक कार्यकर्त्यांना आदेश देतात पण स्वतः त्याचं पालन करत नाहीत. अशा लोकांना आमच्या गावाकडचे लोक उंटावरून शेळ्या हाकणारे असं म्हणतात. म्हणजेच केवळ कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे आणि स्वतः मात्र त्याचं पालन करायचं नाही. अशाच काळात या लोकांचे खरे चेहरे उघडे पडतात.

संपूर्ण देशभरात काल (३० मार्च) श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती, अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मोठा उत्साह साजरा करण्यात आला.

हे ही वाचा >> “…तर स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवा”, अमोल मिटकरींचं राज ठाकरेंना आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंना अमोल मिटकरींचा टोला

राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे टीका केली होती. मिटकरी यांनी लिहिलं होतं की, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात, “हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा”