मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आज(शुक्रवार) स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 चा शुभारंभ झाला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी याबाबत थोडक्यात माहिती दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले “स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 याची आज सुरुवात झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत साडेबारा हजार कोटी रुपायांचा एक मोठा आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व शहरांमध्ये स्वच्छता, नवीन सार्वजनिक शौचालयांची निर्मिती, सर्व प्रकारच्या घनकचऱ्याची प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया असे सर्व कार्यक्रम खूप मोठ्याप्रमाणावर होणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. स्वच्छ शहरं तयार करण्यासाठी एक नवीन पाऊल आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने उचललं आहे.”

तर सेंट्रल व्हिस्टा वरून विरोधकांकडून होत असलेली टीका व यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीसांनी “सेंट्रल व्हिस्टा हा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे आणि तो देशाचा मानबिंदू आहे. या मानबिंदूला नुकसान पोहचवण्याचं किंवा त्यामध्ये अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही पाहिजे.” असं यावेळी सांगितलं.

करोना साथीच्या पहिल्या लाटेदरम्यान भारतातील परिस्थिती अत्यंत भीषण होती. या काळातही सरकारकडून ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाचे काम सुरू होते. यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात येत होती. याविरोधात न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारने या विरोधानंतरही काम सुरुच ठेवले होते. बांधकाम करणाऱ्या कामगारांची प्रकल्पाच्या परिसरातील ठिकाणीच राहण्याची सोय करण्यात आली होती. करोना नियमांचे पालन करुन हे बांधकाम करण्यात येत असल्याचे त्यावेळी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छतेबाबत सरकारकडून दरवर्षी विविध उपाययोजना केल्या जाता मात्र अजुनही लोकांच्या वागणुकीत काहीना काही उणीव असल्याचे दिसून येत आहे. यावर बोलताना फडणवीसांनी “मी असं मानतो की लोकांच्या वागणुकीत फार मोठा बदल झाला आहे. १०० टक्के बदल झाला आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. मात्र बहुतांश लोकांनी आपल्या सवयी बदलल्या आहेत. मी विशेषकरून मुलांना धन्यवाद देईन, मुलांनी स्वत:च्या सवयी तर बदलल्या आहेतच, परंतु आपल्या आई-वडिलांच्या सवयी देखील मुलं बदलत आहेत.” असं म्हणत प्रतिक्रिया दिली.