आर. आर. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमन पाटील यांची विधानसभेतील निवड बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न आज धुळीस मिळाले. भाजपाच्या युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यासह ९ जणांनी उमेदवारी कायम ठेवल्याने तासगाव-कवठे महांकाळची निवडणूक अटळ ठरली आहे. या ठिकाणी ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे.
आबांच्या अकाली निधनाने तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघासाठी पोटनिवडणूक होत असून या ठिकाणी आबांच्या पत्नी श्रीमती पाटील यांच्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या विनंतीला प्रतिसाद देत काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी या ठिकाणी उमेदवारी न देता श्रीमती पाटील यांना पािठबा दिला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी १९ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापकी १० जणांनी अंतिम दिवसापर्यंत उमेदवारी मागे घेत श्रीमती पाटील यांना पािठबा दर्शविला. मात्र भाजपाने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेऊनही सावर्डे येथील स्वप्नील पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या शिवाय मदानात अन्य उमेदवार असे आहेत, डॉ. आनंदराव पवार – तासगाव, अलंकृता आवाडे – सातारा, सुभाष अष्टेकर – तासगाव, सतीश सनदी – मालगाव, प्रशांत गंगावणे – मुंबई, धनंजय देसाई – ढालगाव आणि विजय पाटील – मिरज असे अन्य अपक्ष उमेदवार आहेत.
तासगावमध्ये खरी लढत श्रीमती पाटील आणि स्वप्नील पाटील यांच्यातच होण्याची चिन्हे दिसत आहेत. श्री. पाटील हे अजितराव घोरपडे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी झालेल्या बठकीस हजर होते. श्री. घोरपडे यांनी पक्षाचा आदेश मानण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्री पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपली उमेदवारी दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tasgaon kavathe mahankal election unavoidable
First published on: 28-03-2015 at 04:00 IST