या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या हवेतील तापमानात वाढ झाली असून त्याचा परिणाम फळबागायतीवर होण्याची भीती आहे.

सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री तापमानातील समतोलातील फरक बागायतींना होईल, असे जाणकार सांगतात.  सिंधुदुर्गात सकाळी २४ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

संध्याकाळी ४ वा. ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेतील तापमान वाढलेले असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाची दाट शक्यता या वातावरणातून दिसून येत आहे.

जिल्हय़ातील हे वातावरण आंबा, काजू बागायतींना धोकादायक वाटत असल्याचे सांगण्यात येते. या ढगाळ वातावरणामुळे उशिराने मोहर आलेल्या फलधारणेस धोका होऊ शकतो.

तसेच सकाळी पडणाऱ्या खार धुक्यामुळे मोहर गळून पडू शकतो अशी भीती आहे. जिल्हय़ात गेले काही दिवस उष्णतेच्या लाटा बसत असून  दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी ४ वा. ३५ अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature raised in sindhudurg
First published on: 04-03-2016 at 01:00 IST