scorecardresearch

सातारा : खंबाटकी बोगद्यात मोटारीचा भीषण अपघात, दोन जागीच ठार; पाच गंभीर जखमी

भीषण अपघातात दोन ठार, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

car accident Khambataki tunnel
खंबाटकी बोगद्यात मोटारीचा भीषण अपघात, दोन जागीच ठार (image – लोकसत्ता टीम)

वाई : सातारा पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पुण्यातील सराफ कुटुंबीय मोटारीतून( क्र. एमएच १४ डीएफ ६६६६ ) गोकर्ण महाबळेश्वरला गेले होते. सहल संपवून पुण्याला परत जात असताना त्यांच्या गाडीला खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा – शिक्षक मतदारसंघ निवडणूक : नक्षलवादग्रस्त गडचिरोलीत दोन तासांत १२ टक्के मतदान

हेही वाचा – विधानपरिषद निवडणूक: भाजपा उमेदवार रणजीत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप!

जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे खंबाटकी बोगद्यातील वाहतूक खंडित होऊन वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:32 IST
ताज्या बातम्या