‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना संघर्ष आणखीनच वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही त्यांचं नाव सांगाच,” आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले “दादागिरी फक्त…”

“खोटं बोलण्याचं नाट्य सुरु असून हे आता संपलं पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी देशात अनेक राज्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे असं म्हटलं आहे. पण स्पर्धेबद्दल बोलायचं गेल्यास महाराष्ट्र कुठे कमी पडतोय का? याबाबत चर्चा करण्यासाठी मी त्यांना आव्हान देतो. हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर चर्चेला यावं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

फडणवीसांनाही आव्हान

“मी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, टाटाच्या ज्या उच्च अधिकाऱ्याने महाराष्ट्रात वातावरण योग्य नाही सांगितलं त्याचं नाव सांगावं. दादागिरी सत्ताधारी पक्षाकडूनच चालते, आमच्याकडून कोणालाही धोका नाही. या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना उद्योगासाठी चांगलं वातावरण नव्हतं असं सांगितलं हे त्यांनी जाहीर करावं. कारण आम्हाला केंद्र सरकार सांगेल तिथे आम्हाला जावं लागेल असं सांगण्यात आलं होतं,” असं आदित्य ठाकरेंनी ‘टाटा-एअरबस’ प्रकल्पासंबंधी बोलताना सांगितलं.

पुढे ते म्हणाले “हा प्रस्ताव जर सप्टेंबर २०२१ मध्ये झाला असेल तर मग नितीन गडकरी तसंच आम्ही सर्वांनी पत्र का लिहिलं? कदाचित आम्हाला माहिती नसेल पण तुम्ही २०१६ पासून पाठपुरावा करत असाल तर हे तुमचं अपयश आहे. २०१६ ते २०१९ दरम्यान राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार असतानाही नागपूरमधील मिहानमध्ये तुम्ही हा प्रकल्प आणू शकला नाहीत”.

Vedanta Foxcon: फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, केंद्राकडे बोट दाखवून अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

फडणवीस काय म्हणाले आहेत?

“२३ सप्टेंबर २०२१ रोजी टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये होतोय अशी बातमी आली होती. तेव्हा कोणाचे सरकार होते? आम्ही विरोधीपक्षात गेलो की राज्य विसरत नाही. २०१६ साली हा प्रकल्प येत होता, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही स्पर्धेत होते. तेव्हा मी म्हणालो होतो की, गुजरातपेक्षा जास्त जागा देऊ. त्यानंतर सराकर बदललं आणि मी विरोधी पक्षात असतानाही टाटाच्या प्रमुखांना माझ्या ‘सागर’ या निवासस्थानी बोलावलं. त्यावेळी त्यांनी इथलं वातावरण उद्योगासाठी योग्य नाही असं सांगितलं’, असा दावा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray faction shivsena aditya thackeray challenge cm eknath shinde for open debate over maharashtra business hub sgy
First published on: 31-10-2022 at 18:58 IST