राज्याती करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे, रूग्णसंख्येत दररोज मोठी वाढ सुरू आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा करत, लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम असल्याने, १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आरक्षणाचा गोंधळ, परीक्षांचा बट्याबोळ यानंतर आता ठाकरे सरकारने तरूणांना लसीकरणापासून वंचित ठेवले” असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.

“केवळ केंद्राकडे मागण्या करायच्या आणि परवानगी दिल्यावर आता कार्यवाहीला वेळ लागेल असे निमित्त देऊन जनतेला ताटकळत ठेवायचे. मग पुन्हा नवीन कोणत्या तरी मागणीसाठी रडत बसायचे हेच या सरकारचे धोरण आहे.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

तसेच, “आरक्षणाचा गोंधळ, परीक्षांचा बट्याबोळ या नंतर आता राज्यातील युवाविरोधी ठाकरे सरकारने, देशातील इतर राज्यातील युवक १ मे पासून लस घेत असताना धोरणाअभावी राज्यातील तरूणाला लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. तरुणांना मोफत लस देणार अशी माध्यमामध्ये हवा करणारे सरकार पुन्हा एकदा तोंडघशी..” अशी टीका देखील केली आहे.

“१८ वयोवर्षापुढील सर्वांना लस मिळावी व राज्य सरकारला लस खरेदीची परवानगी मिळावी या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या दोन्ही मागण्यांना परवानगी दिल्यावर मात्र, राज्य सरकारचा बोलघेवडेपणा उघडा पडला आहे.. असंही केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

याचबरोबर, “आसाम, गोव्यासारख्या राज्यांनी लसीची मागणी नोंदवत असताना मात्र इथे निव्वळ घोषणाबाजी सुरू होती. लसीच्या अभावी १मे पासून लसीकरण सुरू करता येणार नसल्याचे कारण देत आहेत.जर राज्यसरकारने १८ वयोवर्षापुढील सर्वांना लस मिळावी अशी मागणी केली तर त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी का नाही केली?” असा जाब देखील त्यांनी ठाकरे सरकारला विचारल आहे.

“लसी कशा प्रकारे उपलब्ध करणार, त्याचे वितरण, कोणत्या देशाची किंवा कंपनीकडून लस खरेदी करणार आहोत त्याची किंमत, ती कधीपर्यंत उपलब्ध होऊल अशी प्राथमिक बोलणी करणे आवश्यक नव्हते का? राज्याचे स्वत:चे नियोजन आराखडा काय?” असे प्रश्नही केशव उपाध्येंनी ठाकरे सरकारला विचारले आहेत.

लस मोफत, पण विलंबाने!

तर, राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र, लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र दिनापासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट के ले. लशींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात येणार असून, सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य वा वयोमानानुसार टप्पे तयार करण्याची सरकारची योजना आहे.