मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. याकरता नवी मुंबईतील वाशी येथे भव्य जाहीर सभा झाली. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. आज धुळ्यात कँग्रेसचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

“मनोज जरांगेंचं उपोषण मुख्यमंत्री आणि जळगावचे सुपूत्र यांनी जाऊन सोडवलं. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत?” असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला. “राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच काही कळायला मार्ग नाही. यांनी सुरुवातीला ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही, असं म्हटलं होतं. विधानसभेतही त्यांनी तेच सांगितलं होतं. सरसकट आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं. मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं याचा खुलासा केला पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/cats_ee077e.jpg
“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

हेही वाचा >> सातारा : सरकारने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिला – शिवेंद्रसिंहराजे भोसले

“जनगणना करून आरक्षण द्या अशी आमची सातत्याने मागणी राहिली आहे. लोकसभेच्या अधिवेशनात ५० टक्क्यांचं आरक्षण तोडून सगळ्यांना न्याय द्या. राहुल गांधी सातत्याने बोलत आहेत की जनगणना करा. आर्थिक मागास असलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसने मांडली आहे. मराठ्यांना फसवलं की ओबीसींना फसवलं हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे भाजपाप्रणित सरकारने दोन समाजात वाद निर्माण करण्याचं काम केलं आहे”, असा घाणाघात नाना पटोले यांनी केला.

“मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे. तसेच फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही”, असा इशाराही नाना पटोले यांनी यावेळी दिला.