कराड : शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून झाल्याची घटना आंधळी (ता. माण) येथे घडली. तर, या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केवळ चार तासात उलघडा केला. पूर्ववैमनस्यातून चुलत भावानेच आपल्या भाऊ व भावजयीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. 

संजय रामचंद्र पवार (४९) व त्यांची पत्नी मनीषा (४८) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर, पोलिसांनी या गुन्ह्यात मयत संजय पवारचा चुलत भाऊ दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (३५) यास अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या वादातून बापूराव पवारने आपल्या सख्ख्या चुलत भावाचा व भावजयीचा मध्यरात्रीच्या सुमारास ते शेताला पाणी देत असताना धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून केला. आज सकाळी काही ग्रामस्थांना शेतात संजय पवार व त्यांची पत्नी मनीषा हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. या गुन्ह्याची नोंद दहिवडी पोलिसात झाली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अधिक तपास करीत आहेत.