लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील आमदारही प्रचाराला लागले आहेत. प्रचारादरम्यान शाब्दिक तोल जाऊन अनेकांकडून खळबळजनक विधाने बाहेर येऊ लागली आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भर सभेत मंत्रालयातील पैशांबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंगेश चव्हाण जळगावात बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सर्व सहकारी मंत्री यांच्याकडे मंत्रालयातील तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरीच्या चावीवाला आपला दोस्त आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो, दणदणाट पैसे वाटतो. एखाद्याने गावाने निधी मागितला, तर मी नाही म्हणतच नाही कधी”, असं मंगेश चव्हाण म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “कोण संजय राऊत? माझा स्तर पाहून तरी…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल; म्हणाले, “दर्जा असणाऱ्या…”

मंगेश चव्हाण कोण?

मंगेश चव्हाणांच्या या वादग्रस्त विधानावरून सरकारकडून दखल घेतली जाते का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, लोकांच्या करातून आलेला पैसा जर अशापद्धतीने वाटला जात असेल तर मंत्रालयातील तिजोरी सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगेश चव्हाणांवर आता टीका-टीप्पणी सुरू होईल. तसंच, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि इतर सर्व मंत्रिमं?डळाचा उल्लेख केल्याने या वक्तव्याचं गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई होतेय का हेही पाहावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगेश चव्हाण हे एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत असताना त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत तर खडसे यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत त्यांनी थेट मुक्ताईनगर डेअर संस्थेतून निवडणकू लढवली होती. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना त्यांनीच पराभूत केले.