रायगड जिल्ह्यात करोनामुळे दिवसभरात तब्बल २९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिवसभरात ४४० करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५०० जण करोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. यातील ५७१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात ४४० नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १५७, पनवेल ग्रामिणमधील ५४, उरणमधील ३६, खालापूर १९, कर्जत १०, पेण ५०, अलिबाग ३०, मरुड १०, रोहा २५, सुधागड ५, श्रीवर्धन ८, म्हसळा १, महाड ३३, पोलादपूर २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत १०, पनवेल ग्रामिण १, उरण ४, खालापूर ४, पेण ३, अलिबाग २, मुरुड २, रोहा १, श्रीवर्धन १ महाड १, पोलादपूर येथे १ अशा एकूण ८ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५०० जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ६७ हजार ४९४ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३९५ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ५०७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३६७, उरणमधील १६४, खालापूर २०५, कर्जत ७७, पेण २३७, अलिबाग २३७, मुरुड ३७, माणगाव ७६, तळा येथील ९, रोहा २६७, सुधागड २८, श्रीवर्धन २२, म्हसळा १०, महाड १३९, पोलादपूरमधील १३ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ८० टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of victims in raigad has crossed 20000 aau
First published on: 13-08-2020 at 21:52 IST