कोल्हापुरातील रंकाळा परिसारात तोरस्कर आणि भोसले या दोन गटाच्या वादातून अज्ञातांनी रिक्षा आणि मोटारसायकल जाळली आहे. तसेच परिसरातील पानारी मळा या भागात राहाणाऱ्या किशोर भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील रंकाळा परिसरात राहणाऱया किशोर भोसले आणि रणजित मोरस्कर यांच्यात वारंवार हाणामाऱया होत असतात. या वैमनस्यातून मोरस्कर गटाने शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भोसले यांच्या घराला बाहेरून कडया लावून आग लावली. मात्र, आग लागल्याचे समजताच भोसले कुटुंबियांनी मागच्या दरवाजातून पलायन केले. त्यामुळे भोसले यांच्यासह त्यांची गरोदर पत्नी आणि अन्य तीन जण सुखरूप बचावले. मात्र, या आगीत त्यांचे घर जळून खाक झाले. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The whole house burn in kolhaur
First published on: 30-11-2014 at 12:21 IST