महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवत आहोत. महायुती म्हणून आमच्यात योग्य समन्वय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

काय म्हणाले संजय राऊत?

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळतं आहे आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागलं पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे काम करु आम्ही त्यांचं. काँग्रेसच्या नेत्यांना सांगलीत भेटणार आहोतच. विश्वजीत कदम, विशाल पाटील आमचेच आहेत. आघाडीत प्रत्येक पक्षाला वाटतं की हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा. मात्र आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपाशी युती असतानाही असं झालं आहे. इथे तीन पक्ष आहेत. विशाल पाटील आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी शिवसेना घेईल.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “…यांच्यापेक्षा आमचा प्रभाकर मोरे बरा”, आशिष शेलारांची कवितेमधून राऊत आणि निरुपम यांच्यावर टीका

विशाल पाटील संसदेत कसे जातील हे पाहू

आम्ही आमच्या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांचा प्रचार करायला आलो आहोत. विशाल पाटील संसदेत कसे जातील ते आम्ही पाहू. विमानतळाचा प्रश्न सोडवू हे मिरजेच्या सभेत चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

..तर दोन महिन्यांनी राणे तुरुंगात

नारायण राणेंनी वक्तव्य केलं आहे की उद्धव ठाकरेंना अटक होणार त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मग नारायण राणे कुठे असतील? दोन महिन्यांत सत्ता आमची येते आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते कुठे असतील तिहार जेलमध्ये.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच नवनीत राणांबाबत मी काहीही बोलणार नाही. काही लोकांविषयी मत न व्यक्त करणंच योग्य असतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.