लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मंगल कार्यालयात लग्न सोहळ्याची धामधूम सुरू आसतानाच चोरट्यांनी नजर ठेवून वर पक्षाच्या खोलीतून पाच लाख ५२ हजार रूपये किंमतीच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची पिशवी हातोहात लंपास केली. माळशिरस तालुक्यातील पुरंदावाडे येथे हा प्रकार घडला.

आणखी वाचा-सांगली : धूम स्टाईलने महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावीर लक्ष्मण कोळेकर (रा. जळभावी, ता. माळशिरस) यांच्या कुटुंबीयांतील लग्न सोहळा पुरंदावडे येथील शिवामृत मंगल कार्यालयात आयोजिला होता. वऱ्हाडी मंडळींसह पै-पाहुण्यांच्या गर्दीत लग्नाची धामधूम सुरू असताना लग्नाची घटिका येण्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी वर पक्षाच्या खोलीत नजर ठेवून तेथील सोने-चांदीचे दागिने असलेली पिशवी अलदपणे लांबविली. थोड्याच वेळात हा प्रकार लक्षात आला. तेव्हा मंगल कार्यालयात गोंधळ उडाला. या गुन्ह्याची नोंद पोलिसांत झाली आहे.