अहिल्यानगर : शहरातील कोठला भागात काल, सोमवारी झालेल्या दगडफेक, तोडफोड व रास्तारोको प्रकरणी पोलिसांनी एकुण २०० जणांपैकी ३० आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवस, ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज, मंगळवारी दिला. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी ही माहिती दिली.
महोमंद सरफराज इब्राहीम सय्यद ऊर्फ सरफराज जहांगिरदार (वय ३७), फरदीर इरफान खान (वय १८, दोघे रा. मुकुंदनगर), जुनेद अमीर शेख (वय ३८), सलमान आरिफ शेख (वय २३, दोघे रा. बेलदार गल्ली), गुलफान निहाउद्दीन अन्सारी (वय २५), शाहरूख फारूख शेख (वय २४), मुदस्सर शब्बीर शेख (वय २५, सर्व रा. कोठला), राजीक अफरोज कुरेशी (वय २२, झेंडीगेट), हमजा शाहिद शेख (वय २०), अल्तमश अल्ताफ शेख (वय २६), शाहबाज हरून शेख (वय ३५), अकिल राजमोहंमद शेख (वय २४), जुबेर फारूख शेख (वय ३०), जहेद जाहीद शेख (वय २०), राहिल मिराजमिया सय्यद (वय २८, सर्व रा. मुकुंदनगर), अक्रम रियाज शेख (वय २८, रा. तपोवन रस्ता, सावेडी), निसार दाऊद शेख (वय ५१, रा. मंगलगेट), तबरेज ऊर्फ चाँदमिया मिर सय्यद (वय २५), अमीर अन्वर शेख (वय २९, दोघे रा. मुकुंदनगर), नदीम शौकत शेख (वय २१, रा. पिंपळगाव उजनी, ता. नगर), अदनान अल्ताफ अत्तार (वय २२ रा. मुकुंदनगर), सोहेल आयुब शेख (वय २३, रा. कोठला), इर्शाद जकीर शेख (वय २० रा. मुकुंदनगर), जाकीर ताहिद शान ऊर्फ जावेद ताहिर खान (वय २५ रा. कोठला), जिशान कदीर अत्तार (वय २२), दानीश रज्जाक शेख (वय २५ दोघे रा. मुकुंदनगर), सादिक युनुस शेख (वय ३०, रा. कराची
नगर शहरातील माळीवाडा भागात दुर्गा दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकूरावरून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून सोमवारी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यातून काल सकाळी नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील कोठला चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास हिंसक वळण लागले. जमावाने दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली. त्यात ६ पोलीस देखील जखमी झाले. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे १५० ते २०० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या तपासात यातील सुमारे ४७ संशयितांचे नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील ३० जणांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. तसेच ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांना नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले.