अलिबाग : आज मुंबईतून पुण्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे…खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे गर्डर टाकण्याचे काम आज केले जाणार आहे. या कामासाठी मुंबई पुणे दृतगती मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत दृतगती महामार्गावरील पुण्याकडील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने याबाबतचे प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे.

हेही वाचा… अग्रलेख: शस्त्रविरामाची शहाणीव!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोपोली ते पाली फाटा या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून, सुमारे ५० टन वजनाचे पुलाचे गर्डर बसविण्याचे काम केले जाणार आहेत या कामासाठी मुंबई पुणे दृतगती मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यास वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी परवानगी दिली आहे.