जालना : महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तीन भावंडांचे मृतदेह जाफराबाद तालुक्यात एका शेततळ्यात आढळून आले आहेत. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

रोहण रमण जोशी (७), दीपाली रमण जोशी (९) हे दोन सख्खे बहीण-भाऊ आणि यश अनिल जोशी (१४) या त्यांच्या चुलत भावाचा समावेश मृतांमध्ये आहे. जाफराबाद तालुक्यातील वरुड गावातील ते रहिवाशी होते . सोमवारी (२ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही भावंडे डोलखेडा रस्त्यावरील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायंकाळपर्यन्त ती घरी परतली नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी यासंदर्भात जाफराबाद पोलिसांना कळविले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यन्त या मुलांचा शोध सुरु होता. परंतु मंगळवारी सकाळी तिघांचे मृतदेह शेततळ्यात आढळल्याने जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिन्ही मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी पोलिस अधिक करीत आहेत.