महाराष्ट्रात आज १६ हजार १७७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण १४ लाख ३१ हजार ८५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ८८.१ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ७ हजार ५३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के इतका झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख २ हजार ५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख २५ हजार १९७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५९ हजार ४३६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २४ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५० हजार ११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ७ हजार ५३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १६ लाख २५ हजार १९७ इतकी झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total cases in the maharashtra rise to 1625197 including 42831 deaths and 1431856 recovered patients scj
First published on: 22-10-2020 at 20:19 IST