बीड-परळी मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे आणि त्यांच्या नऊ वर्षाचा मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. कोमल शिंदे आपल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जाताना हा अपघात झाला. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

दोन जण गंभीर जखमी

दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे आपल्या ९ वर्षाच्या मुलाला घेऊन रुग्णालयात जात होत्या. यावेळी बीड-परळी मार्गावर समोरुन येणाऱ्या गाडीची धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती, की दोन्ही गाड्या उडून रस्त्याच्या बाजूला पडल्या. या घटनेत कोमल शिंदे आणि त्यांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चालक पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटळे आणि परळीचे शासकीय डॉक्टर इलियाज अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरसाळा पोलिसांनी तात्काळ अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.