सांगली : शाळेच्या बसमधून उतरुन घरी जाताना दोन सख्ख्या बहिणींना भरधाव मोटारीने धडक दिल्याने थोरल्या मुलीचा मृत्यू झाला, तर लहान मुलगी गंभीर जखमी झाली.  जत तालुक्यातील उटगी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. श्रावणी व श्रध्दा उमेश लिगाडे या दोन्ही बहिणी उमदी समता नगर येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कुल या ठिकाणी इयत्ता चौथी व दुसरीच्या वर्गात शिकत होत्या.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या; धाराशिव जिल्ह्यातील तरुणाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन

24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

यातील श्रावणी  (वय १०) वर्ष हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर तिची लहान बहीण श्रद्धा (वय ८) वर्ष ही गंभीरजखमी झाली असून तिच्यावर मिरजेतीलखासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उमदी येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कुल समतानगर येथे शिकत असलेल्या श्रावणी लिगाडे व श्रध्दा लिगाडे या शाळा सुटल्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान उटगी पासुन उमदीकडे काही अंतरावर असलेल्या लिगाडे यांच्या शेताजवळ स्कूल बस मधुन उतरुन आपल्या शेतातील घराकडे जात होत्या. याचवेळी उटगी कडुन उमदीकडे जात असलेल्या भरधाव मोटारीने ( एमएच १०-२८३८) जोराची धडक दिल्याने या दोन्ही शाळकरी सख्ख्या बहिणींना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचाराकरता जत कडे नेत असताना मोठी मुलगी श्रावणी हीचा मृत्यू झाला. तर श्रद्धा ही गंभीर जखमी झाली असुन तिला पुढील उपचारासाठी मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.