भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. या द्वयींच्या विधानामुळे राज्यात सध्या संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन याबाबत शिंदे गटाची भूमिका काय आहे? ते स्पष्ट करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. असे असतानाच या सर्व वादावर शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी संवाद साधण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतील, असे सामंत म्हणाले. ते मुंबईत आज (२० नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> राज्यपाल कोश्यारी, भाजपाविरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले “यांच्या बापाने…”

“या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करतील. आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारे लोक आहोत. शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांनीच आदराने बोलले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे उदय सामंत म्हणाले. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> कोश्यारींच्या विधानावर मुनगंटीवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया; बाळासाहेब ठाकरे, पवारांचं उदाहरण देत म्हणाले “त्यांनी कालबाह्य हा शब्दच…”

“छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रत्येकाने आदरानेच बोलले पाहिजे. एखादी व्यक्ती वैयक्तिक पातळीवर जे बोलली तेच सरकारचे मत आहे, असे मानने चुकीचे आहे,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

भाजपाची काय भूमिका?

हेही वाचा >>> कोश्यारी, भाजपाला नाना पटोलेंचा जाहीर इशारा, म्हणाले, “माफी मागा अन्यथा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर भाजपावर टीका केली जात आहे. यावर भाजपाची भूमिका काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. त्यानंतर कोश्यारी यांच्या विधानावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही. बाळासाहेब ठाकरे यांना काही लोक प्रतिशिवाजी म्हणायचे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे प्रतिशिवाजी होते का? याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. शरद पवार यांना जानता राजा म्हणायचे. आपण उदाहरण देताना प्रतिकात्मकता म्हणून ते वापरतो. दोन भावांमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण आहेत, असे म्हणतो,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.