राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील विधानानंतर खासदार उदयनराजे भोसले नाराज आहेत. याच कारणामुळे आज प्रतापगडावर साजरा होणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या सोहळ्याला उदयनाराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगडावर दाखल झाले आहेत. शिवेंद्रराजे भोसले हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मात्र उदयनाराजेंच्या संभाव्य अनुपस्थितीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आज ३६३ वा शिवप्रतापदिन आहे.

हेही वाचा >> आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना जाहीर चर्चेचं आव्हान दिल्यानंतर भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “माजी मुख्यमंत्री घरी…”

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार उदयनराज भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवेंद्रराजे प्रतापगडावर उपस्थित आहेत. मात्र उदयनाराजे भोसले अद्याप कार्यकमस्थळी आलेले नाहीत.

हेही वाचा >>धक्कादायक! उलटीच्या त्रासामुळे रुग्णालयात गेला, अन् डॉक्टरांनी पोटातून काढली तब्बल १८७ नाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवप्रतादिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. ढोल ताशाच्या गजरात शिवरायांचा जयघोष केला जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.