केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मंजूर केलं आहे. मात्र त्याचवेळी बंडखोर गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला कोणतेही निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं नाही. उद्धव ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली होती. तर शिंदे गटाकडून गदा, त्रिशूळ आणि उगवता सूर्य अशी तीन चिन्हं सुचवण्यात आली होती. मात्र या सहा चिन्हांपैकी केवळ एका चिन्हाला मान्यता देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत
वेगवगेळी पत्रं…
निवडणूक आयोगाने दोन्ही गटाच्या नेत्यांना वेगवेगळी पत्र पाठवून निवडणूक चिन्हं का नाकारण्यात आली आहेत याबद्दलची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने २३ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या यादीमधील उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीमध्ये दोन्ही गटांकडून सुचवण्यात आलेल्या चिन्हांपैकी अनेक चिन्हांचा समावेश नव्हता, हे सर्वात महत्तवाचं कारण ठरलं.
त्रिशूळ नाकारण्याची कारणं काय?
दोन्ही गाटांकडून पहिली पसंती देण्यात आलेलं त्रिशूळ चिन्ह नाकरण्यामागे या चिन्हाचा थेट धार्मिकबाबींशी संबंध असल्याचं कारण निवडणूक आयोगाने दिलं आहे. हे चिन्हं देणं हा निवडणूक चिन्हांसंदर्भातील नियमांचं उल्लंघन ठरेल, असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच दोन्ही गटांकडून त्रिशूळ हे चिन्हं पहिली पसंती म्हणून सांगण्यात आल्याने ते कोणालाच न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नक्की वाचा >> “मलाच CM व्हायचं आहे इथंपर्यंत…”, “आता अती होतंय…”, “तेव्हाही त्रास झालाच पण…”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
उगवता सूर्य का नाकारला?
उगवता सूर्य हे चिन्ह नाकारताना हे चिन्ह आधीपासूनच द्रविड मुन्नेत्र काझिगम म्हणजेच डीएमके पक्षाची निशाणी आहे. हा पक्ष तामिळनाडूमधील आहे. १९६८ च्या निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे राज्य स्तरावरील इतर पक्षांसाठी राखीव चिन्हं दुसऱ्या पक्षांना देता येत नाहीत. तसेच या चिन्हाचीही त्रिशूळप्रमाणे दोन्ही गटांकडून मागणी करण्यात आल्याने ते कोणालाच देता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
नक्की वाचा >> शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यासंदर्भात विचारलं असता रितेश देशमुख म्हणाला, “येणाऱ्या काळात जे घडणार आहे त्यावरुन आपल्याला…”
शिंदेंना गदा का नाकारली?
शिंदे गटाने गदा या चिन्हाचाही समावेश पसंतीच्या चिन्हांमध्ये केलेला. मात्र त्रिशूळप्रमाणे या चिन्हाचाही संबंध धार्मिकबाबींशी असल्याने ते देता येणार नाही असं कारण आयोगाने सांगितलं. तसेच हे चिन्ह उपलब्ध चिन्हांच्या यादीत नसल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला
उद्धव यांना मशाल का दिली?
मशाल हे चिन्ह उपलब्ध चिन्हांच्या यादीत नाही. हे चिन्ह समता पक्षासाठी राखीव आहे. मात्र २००४ साली या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तुम्ही ९ ऑक्टोबर रोजी केलेल्याव विनंतीनुसार निवडणूक आयोगाने मशाल या चिन्हाचा उपलब्ध चिन्हांमध्ये समावेश केला असून ते तुमच्या गटाला दिलं जात आहे, असं आयोगाने म्हटलं आहे.
शिंदे गटाचं काय होणार?
एकनाथ शिंदेंच्या गटाने दिलेले तिन्ही पर्याय नाकारण्यात आले आहेत. त्यामुळेच उद्या म्हणजे ११ ऑक्टोबरपर्यंत इतर तीन पसंतीच्या चिन्हांबद्दल आयोगाला कळावावं असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सकाळी १० वाजेपर्यंत तीन चिन्हांबद्दल शिंदे गटाने कळवणं बंधनकारक असणार आहे.
नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”
नावं काय?
उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मंजूर करण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मंजूर करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी पहिली पसंती म्हणून ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’ हे नावं सुचवलं होतं. मात्र दोन्हीकडून या नावाची मागणी झाल्याने दोन्ही गटांना दुसऱ्या पसंतीची नावं देण्यात आली आहेत.