वाई: महाबळेश्वर तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेत जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी करत केलेल्या अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशाने वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी कारवाई करत ही अनधिकृत बांधकामे आज रविवारी पडली.

महाबळेश्वर तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेत जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी करत मेटगुताड येथील दोन अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशाने वाई चे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी खंडाळा, वाई, महाबळेश्वर तहसीलदारांच्या मदतीने नियोजन करून सोबत महसूल विभागातील कर्मचारी, महाबळेश्वर, पांचगणी पालिका कार्यालयातील कर्मचारी, पोलीस विभाग व सर्व आवश्यक वाहनासह पथक मेटगुताड येथे पहाटे पोहोचले. त्यांनी येथील श्रीमती मनीषा राजेश पाटील , द्वारकादास गंगाधरदास गुरेघर येथील श्रीमती प्राची दिनेश नगपोरवाल यांनी बांधलेले अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आली. सदर वेळी महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक श्री नलावडे पांचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा…सांगली : जनसुराज्यचा उद्या मिरजेत युवा संवाद मेळावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाबळेश्वर तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेत जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी करावयाचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे,परवानगी न घेता बिगरशेती वापर करून केलेल्या अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. त्यावर आज कारवाई करण्यात आली. यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.