कुमठे (ता.तासगाव) येथील दिव्यांग निवासी शाळेतील सहावीत शिकत असलेल्या मुलावर राखणदाराने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
हेही वाचा – “२०१३ अन् २०१८ साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…”, शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
कुमठे येथे दिव्यांग मुलासाठी निवासी शाळा असून रहिवाशी असलेल्या सहावीत शिकणार्या मुलावर राखणदार संदीप दत्तात्रय भोकरे याने रात्री साडेअकराच्या सुमारास अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडित मुलगा विव्हळू लागताच अन्य मुलाच्या लक्षात आला. यावेळी सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर मारेन, अशी धमकी देत संशयिताने त्याला मारले. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.