‘मविआ’तील घटक पक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. काँग्रेस सक्षम नेतृत्वहीन असल्याने त्यांच्या पक्षात निर्णय क्षमता नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसंच, ‘मविआ’ आणि वंचितमध्ये आघाडी करण्यावरून अद्यापही चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी आणखी जागा वाढवून देऊ, अशी साद घातली होती. त्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांची भूमिका म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका केली. या टीकेवर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही प्रकाश आंबेडकरांना पसंत केले होते. पण त्यांनी लग्नासाठी का नकार दिला. हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं, त्यासाठी चर्चा करायची होती. पण त्यांनी लग्न मोडलं”, असा खोचक टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला.

हेही वाचा >> “नेतृत्वहीन असल्याने काँग्रेसमध्ये निर्णय क्षमता नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा डागली तोफ; म्हणाले, “काँग्रेस नेत्यांचे विरोधकांशी…”

भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी ते चंद्रपुरात येणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात आज ते सभा घेतील. यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, “भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. विजय महाविकास आघाडीचा होईल, लोकं ऐकायला जातात, पण मतदान करत नाही.”

एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपात परतणार आहेत. याबाबत वडेट्टीवार म्हणाले, “गळ्याला फास लागला बिचारे काय करणार? संजय सिंगला फसवत बेजार केलं. या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, पक्षबदलाची भूमिका त्यांनी घेतली.”

हेही वाचा >> “सुप्रिया सुळे सारखं दादा-दादा करायच्या, तेव्हा मला राग यायचा”, जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणा कोणाच्या भरवश्यावर निवडून आल्या?

दरम्यान, नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. यावरून विजय वडेट्टीवारांनी नवीनत राणा यांना सुनावलं. ते म्हणाले, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. राजकारण स्वार्थी झाले आहे, राजकारण नासवलं आहे, राणा कशा बचबच बोलतात. राणा कुणाच्या भरवशावर निवडून आल्या? शरद पवार या ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वाद आणि काँग्रेसच्या मतामुळे त्या निवडून आल्या होत्या. आता राणांची भूमिका बदलली. लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.”